कामाशिवाय जीवनात दुसरा विचार केला नाही: शर्मिली राज

 

बालपरी म्‍हणून लोकप्रिय असलेली शर्मिली राज म्‍हणते, ”मी कामाशिवाय जीवनाबाबत कधीच विचार केला नव्‍हता”
बालवीर आणि त्‍याची जादुई परींच्या टोळी काहीशा जादुई आणि साहसी व शूर कृत्‍यांसह देशभरातील लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’मध्‍ये खास व अद्वितीय शक्‍ती असलेल्‍या परींचा डायनॅमिक समूह आहे. सर्वात शक्तिशाली दुष्‍टांचा नायनाट करण्‍यासाठी त्‍यांच्‍यामध्‍ये ही शक्‍ती आहे. सोनी सबवरील लोकप्रिय काल्‍पनिक मालिका ‘बालवीर रिटर्न्‍स’ लक्षवेधक पटकथा आणि बालवीरच्‍या भूमिकेत देव जोशी, तिम्‍नसाच्‍या भूमिकेत पवित्रा पुनिया व बालपरीच्‍या भूमिकेत शर्मिली राज अशा अत्‍यंत प्रतिभावान कलाकारांच्‍या दमदार अभिनयासह प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
शूटिंग ठप्‍प असल्‍यामुळे ‘बालवीर रिटर्न्‍स’चे सर्व कलाकार घरातच वेळ व्‍यतित करत आहेत. पण सोबतच ते या वेळेचा सदुपयोग करत त्‍यांच्‍या जीवनात काही जादू आणण्‍यासाठी वेगळे काहीतरी करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. सध्‍या मालिकेमधील परी त्‍यांच्‍या सुपरशक्‍तींचा वापर करू शकत नाही, पण बालपरीची भूमिका साकारणा-या शर्मिली राजला तिच्‍या वास्‍तविक जीवनात सुपरशक्‍ती मिळाल्‍या आहेत, ज्‍यामुळे तिला सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये देखील उत्‍साह उंचावत ठेवण्‍यामध्‍ये मदत होत आहे.
शर्मिली राज ऊर्फ बालपरी म्‍हणाली, ”माझ्यामध्‍ये असलेली सुपरशक्‍ती म्‍हणजे माझ्यामध्‍ये सुष्‍ट व दुष्‍ट गोष्‍टींचा सामना करण्‍यासोबत माझ्या स्‍वत:साठी काम करत राहण्‍याची क्षमता आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍तीमध्‍ये सुष्‍ट व दुष्‍ट बाजू असते. माझा माझ्यासभोवतालच्‍या सकारात्‍मक गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करत कोणत्‍याही नकारात्‍मक विचारांवर मात करण्‍यावर विश्‍वास आहे. हा पैलू माझी भूमिका बालपरीशी अगदी समान आहे. या क्षमतेमुळे मला या अनिश्चित व आव्‍हानात्‍मक काळादरम्‍यान मदत झाली आहे. अशा आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये आपल्‍या जीवनामध्‍ये सहजपणे नकारात्‍मक विचार येऊ शकतात. म्‍हणून माझी आंतरिक शक्‍ती मला भावनिकदृष्‍ट्या व शारीरिकदृष्‍ट्या सकारात्‍मक ठेवण्‍यामध्‍ये मदत करत आहे.”
ती सध्‍या या अनपेक्षित बदलाचा कशाप्रकारे सामना करत आहे, याबाबत बोलताना शर्मिली म्‍हणाली, ”मी कामाशिवाय जीवन असण्‍याबाबत कधीच विचार केलेला नव्‍हता. घरीच राहून माझी आवड म्‍हणजेच अभिनय न करण्‍याचा बदल जीवनात सामावून घेणे माझ्यासाठी अवघड होते. पण काळासह मला समजले की, कामाशिवाय देखील जीवन असू शकते आणि या टप्‍प्‍याने मला माझ्या स्‍वत:साठी देण्याची मोठी संधी दिली आहे, तसेच मला माझ्या कुटुंबाच्‍या खूप जवळ आणले आहे.”
शर्मिली पुढे म्‍हणाली, ”हा ब्रेक नवसंजीवनी आणि पूर्णत: नवीन अनुभव देणारा राहिला आहे. मी पुन्‍हा एकदा कॅमे-यासमोर जाऊन बालपरीच्‍या भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे.”
पाहा शर्मिली राजला बालपरीच्‍या भूमिकेत ‘बालवीर रिटर्न्‍स’मध्‍ये फक्‍त सोनी सबवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!