
उत्तूर: भागातील शेतकऱ्यांचा व गावकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा आंबेओहोळ प्रकल्पाच्या रखडलेल्या कामासह शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने पाऊले उचलावीत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे समरजीतसिंह घाटगे यांनी मागणी केली होती. यावर आता शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत त्याची माहिती घेण्यासाठी आज प्रकल्पाच्या भागाला त्यांनी भेट दिली असता काही शेतकऱ्यांनी जवळील एका शेताच्या बांधावर भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. 2000 साली मंजूर झालेल्या या धरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. भाजपा शासनाच्या काळात माझ्या विनंतीला मान देत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्पासाठी २२७ कोटी रूपयांचा वाढीव निधी मंजूर करत काम वेगाने सुरू केले होते. परंतु सत्ता बदलानंतर अचानक कामाचा वेग पूर्ण थांबला. सध्या मुख्य धरणाचे काम 75% पर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पूर्ण मिटलेला नाही. पुनवर्सनच्या बदल्यात काहीजणांना मंजूर रक्कम मिळाली आहे तर काहींना मिळालेली नाही. पुनर्वसनाची मागणी पूर्ण झाल्यास या कामाला पुन्हा वेग येऊन शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल. पुनर्वसन धारक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने ते हतबल झाले आहेत. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून शेतकऱ्यांनी केलेल्या विनंतीला धरून लिहिलेल्या पत्राने थोडी हालचाल सुरू झाली आहे. आज भेटलेल्या शेतकऱ्यांनी देखील हीच मागणी केली.असेही समरजीतसिंह घाटगे म्हणाले.
Leave a Reply