
औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून, त्याची सुरूवात पुण्यातून करण्यात येणार आहे तसेच लहान मोठ्या सर्व शाहरांना हेल्मेट परिधान करण्याची अट घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
रावते यांनी आज औरंगाबाद येथील एका चौकात हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर पत्रकारंसोबत बोलताना राज्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं. डोक्यावर हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेक दुचाकीस्वारांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळेच दिवाकर रावते यांनी राज्यात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दुचाकी विक्री करताना सोबत हेल्मेट देण्याचा प्रस्ताव असल्याचेही रावते यांनी या वेळी सांगितलं
Leave a Reply