सुडापोटीच कारवाई; भुजबळांचे अमेरिकेतून वक्तव्य

 

मुंबईIMG_20160203_152632 : मी झुंझार नेता आहे. मागासवर्गीयांसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात काम करतोय. त्यामुळं माझे शत्रू मला संपवण्यास पुढे सरसावले आहे. माझा नाहक बळी दिला जात आहे असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांबरोब त्यांच्या कुटुंबियांवरही अंमलबजावणी संचलनालय म्हणजे ईडी नजर ठेवून आहे. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचीही ईडीकडून चौकशी केली.

अंमलबजावणी संचलनालयाने आज छगन भुजबळ  कुटुंबियांशी संबंधित राज्यभरात नऊ ठिकाणी छापे टाकले आहेत. भुजबळ कुटुंबियांची काही घरं आणि कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई होत असल्याची माहिती आहे.

छगन भुजबळ यांनी तब्बल 62 बँकखात्यातून संशयास्पद व्यवहार केल्यामुळेच ही कारवाई होतेय असं भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकूण सोळा ठिकाणी छापे

टाकले होते. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही कारवाई केली होती आणि आता ईडीने धाडसत्र सुरू केलंय. छगन भुजबळ सध्या अमेरिकेत आहेत. पण भुजबळ कुटुंबीयांच्या व्यवहारांवर ईडीची आता नजर असणार आहे. समीर भुजबळयांना आता 8 दिवस ईडीच्या कोठडीत राहवे लागणार आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!