
कोल्हापूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महानगरपालिका म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचा आज सत्कार करण्यात आला. महापौर सौ.अश्विनी रामाणे व आयुक्त पी.शिवशंकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री व मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील, आ.सतेज पाटील, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगरप्रशासन विभागाच्या संचालक मिता राजुलोचन आदी उपस्थित होते. या सत्कार समारंभास महापालिकेच्यावतीने उपमहापौर सौ.शमा मुल्ला, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, नगरसेविका दिपा मगदुम, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महापालिका झालेबद्दल विशेष कौतुक केले
Leave a Reply