
कोल्हापूर: रोटरी डिस्ट्रीक्ट ३१७० च्यावतीने कोल्हापुरात स्नेहबंध डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्सचे येत्या ५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले असून या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील १८०० ते २ हजार रोटरी क्लबचे सदस्य सहभागी होणार आहेत अशी माहिती कॉन्फरन्सचे चेअरमन राजेंद्र दोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कॉन्फरन्सचे उद्घाटन ५ तारखेला दुपारी ४ वाजता मुस्कान लॉन येथे होणार आहे.३ दिवस चालणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये नाबार्डचे चेअरमन यशवंतराव थोरात, रोटरी माजी अध्यक्ष कल्याण बनर्जी,पत्रकार काजल ओझा वैद्य,स्वामी नित्यप्रज्ञा, अॅडव्होकेट पायल चावला यासारख्या नामवंत वक्त्यांची विविध विषयावर व्याख्याने होणार आहेत.कोल्हापूरची खरी ओळख होण्यासाठी कोल्हापूरची वैशिष्टे मिनी कोल्हापूर या संकल्पनेतून साकारणार आहेत.तसेच रोटरी ट्रेड फेअर या प्रदर्शनाअंतर्गत १०० स्टॉल्स असणार आहेत. रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षांचे प्रतिनिधी अजय गुप्ता,एअर मार्शल रविकांत शर्मा,नियोजन मंडळ सदस्य नरेंद्र जाधव या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कॉन्फरन्सचे उद्घाटन होणार आहे.अशी माहिती सेक्रेटरी अमरदीप पाटील यांनी दिली.२००२ सालानंतर तब्बल १४ वर्षांनी परत अशा प्रकारे कॉन्फरन्स कोल्हापुरात होत आहे.२०१५-१६ सालचे डिस्ट्रीक्ट गवर्नर श्रीनिवास मालू आणि कॉन्फरन्सचे चेअरमन राजेंद्र दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कॉन्फरन्स होत आहे.कोल्हापूर डिस्ट्रीक्ट मधील २३ रोटरी क्लब या कॉन्फरन्सचे यजमान आहेत. कॉन्फरन्समध्ये २०१८-१९ या वर्षाकरिता डिस्ट्रीक्ट गवर्नरची निवडही करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला कॉन्फरन्सच्या सेक्रेटरी सौ.शोभा तावडे.व्हाईस चेअरमन श्याम नोताणी उपस्थित होते.
Leave a Reply