
कोल्हापूूूर:महाराष्ट्र राज्य तृतीय पंथीय कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षपदी मयुरीताई आवळेकर आणि अॅड दीलशार मुजावर यांची नियुक्ती झाल्याबद्दल अवनी या संस्थेतर्फे त्यांचा सत्कार समारंभ हणबरवाडी येथील नव्या इमारती मध्ये ठेवला होता हा सत्कार ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अवनीचे विश्वस्त संजय पाटील ,अवनीच्या उपाध्यक्ष अनुराधाताई भोसले आणि सल्लागार स्काॅट व संस्थेच्या 40 मुली उपस्थित होत्या.
आपल्या प्रास्ताविकात अनुराधाताई भोसले म्हणाल्या “महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आम्ही अवनी संस्था सुरु केली आणि ती आता अनेक जिल्ह्यांमध्ये वीट भट्टी मजूर, ऊस तोडणी कामगार यांच्या मुलांच्यासाठी आम्ही धडपडत आहोत. डॉक्टर सुभाष देसाई आपल्या व्याख्यानात म्हणाले “अतिशय सुंदर ,निसर्गरम्य परिसरात येथे राहण्याचं या मुलींनी सोनं करावं आणि अशाच संस्था महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी स्थापन करण्याचे भव्य स्वप्न बाळगायला हरकत नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून तो रयतेचा राजा कसा होता हे विद्यार्थ्यांना त्यांनी समजून सांगितले. राधानगरीतील बनकरवाडी च्या ग्रामस्थांनी धर्माचा पैसा शिक्षणाकडे कसा वळवला याचे उत्तम उदाहरण समजून सांगितले शाश्वत विकास चळवळीबद्दल ही सांगितले
कार्यक्रमाच्या शेवटी शिवकिरण पेठकर यांनी आभार मानले ,संजय पाटील ,संजय मुंगळे एडवोकेट मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले.
Leave a Reply