
कोल्हापूर : भारतीय संस्कृतीतील ‘गुरु–शिष्य परंपरा’ही मानवजातीला हिंदु धर्माने दिलेली अद्वितीय देणगी होय ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु–शिष्य’ परंपरेने केले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या थोर गुरु–शिष्य परंपरेचे स्मरण करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेला 1 हजार पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ सर्वांना व्हावा, तसेच गुरुंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्ष देशभरात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो. या वर्षी, 5 जुलै 2020 या गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी हा महोत्सव सरकारच्या निर्देशांनुसार ‘ऑनलाईन’ माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
Leave a Reply