
सोनी सबने यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला सादर करण्यात आलेली हलकी-फुलकी मूल्याधारित मालिका ‘मॅडम सर‘सह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘कुछ बात है क्यूंकी जजबात है‘ या टॅगलाइनसह ‘मॅडम सर‘ मालिका चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्या दृष्टिकोनांमधून सामाजिक समस्यांचे निराकरण करते. या चारही महिला पोलिस अधिकारी त्यांच्याकडे येणा-या प्रत्येक आव्हानाला स्वीकारतात आणि जजबातसह केसेसचे निराकरण करतात.मालिका प्रतिभावान कलाकार आणि प्रेक्षकांना रोमांचक प्रवासावर घेऊन जाणा-या लक्षवेधक कथानकाच्या अद्वितीय संयोजनासह प्रेक्षकांना अचंबित करते. यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला सादर करण्यात आलेल्या मालिकेमधील कलाकार गुल्की जोशी (हसीना मल्लिक), युक्ती कपूर (करिष्मा सिंग), भाविका शर्मा (संतोष शर्मा) आणि सोनाली नाईक (पुष्पा सिंग) यांना लॉकडाऊन कालावधीदरम्यान एकमेकांची आणि ‘मॅडम सर‘च्या सेटची खूप आठवण येत होती.पण, सर्व खबरदारीचे उपाय घेत आत्ता पुन्हा शूटिंगला सुरूवात झाली आहे. मालिकेचे कलाकार सेटवर पुन्हा परतल्याने आणि त्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आनंदित झाले आहेत. जवळपास ३ महिन्यांच्या अंतरानंतर पहिल्यांदाच ‘मॅडम सर‘च्या सेटवर परतल्याने अनेक बदल पाहायला मिळाले. सर्व कलाकार व टीम एकमेकांच्या आरोग्याच्या खात्रीसाठी प्रत्येक सुरक्षितता उपाय घेत आहेत.
Leave a Reply