
सोनी सबवरील काल्पनिक मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने कथानकासह चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ही एक कौटुंबिक मनोरंजनपूर्ण मालिका आहे. रोमहर्षक साहसी कृत्ये व हृदयस्पर्शी रोमांससह क्लासिक कथेचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या मालिकेने प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रिन्ससमोर खिळवून ठेवले आहे.नवीन एपिसोड्सची वाट पाहणा-या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. सरकारने निर्धारित केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करत योग्य खबरदारीच्या उपायांसह शूटिंगला पुन्हा सुरूवात झाली आहे. सिद्धार्थ निगम ऊर्फ अलाद्दिन सोनी सब व प्रॉडक्शन हाऊसने घेतलेल्या उपायांबाबत प्रभावित झाला आहे. तो शूटिंगच्या पहिल्या दिवसाबाबत त्याचा अनुभव सांगत आहे.‘नवीन नियमां‘सह सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘साठी पुन्हा शूटिंग सुरू करण्याबाबत बोलताना सिद्धार्थ निगम म्हणाला, ”मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’साठी शूटिंग पुन्हा सुरू होत असल्याचे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला. सेटवरील शूटिंग पूर्वीप्रमाणे नसणार, पण आम्हाला माहित आहे की, सोनी सब व प्रॉडक्शन हाऊसने घेतलेले सर्व उपाय सेटवरील आम्हा सर्वांच्या हिताचे आहेत. संपूर्ण प्रॉडक्शन व कलाकार शूटिंगला पुन्हा सुरूवात करण्यासाठी आणि ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’चे नवीन एपिसोड्स सादर करण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.”
Leave a Reply