
कोल्हापूर: गुरू हे फक्त दिशा दाखविण्याचे काम करतात. प्रत्यक्ष आपल्या ध्येयाकडे स्वतःलाच वाटचाल करून सफल व्हायचे आहे, असे प्रतिपादन स्वामी जगदगुरू शंकराचार्य यांनी आज केले.येथील शंकराचार्य पीठामध्ये व्यासपूजा व गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प.प. श्री स्वामीजीनी आशीर्वचन केले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आपले इच्छित ध्येय आपण गाठावयाचे असते. त्यासाठी फक्त गुरू आपणाला दिशा दाखवितात. कारण त्याच मार्गाने गुरूनी जाऊन आपले ध्येय साध्य केले असते. म्हणून गुरूंच्या वाटेने जाऊन ध्येय साध्य करावे.यावेळी स्वामीजीनी ससा आणि कासव यांची कथा सांगतली. त्यामध्ये सशाने किती अंतर चाललो याचा विचार केला, तर कासवाने अजून किती अंतर चालायचे आहे, याचा विचार केला व ती शर्यत जिंकली. त्याचप्रमाणे आपणही याच मार्गाने वाटचाल करून ध्येय साध्य करावे. दरम्यान, अनिरुद्ध जोशी, सुहास जोशी, अवधूत कुलकर्णी, शिवकुमार शास्त्री, ओंकार जोशी यांनी धार्मिक विधी केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमामध्ये स्वामीजीनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने श्रद्धालू उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे सदस्य सुरेश कुलकर्णी, धनंजय मालू, रामकृष्ण देशपांडे व सचिव शिवस्वरूप भेंडे आदी उपस्थित होते.
Leave a Reply