
कोल्हापूर : कोल्हापुरात शंभरावर शाहूकालीन तालीमसंस्था आणि शेकडो मंडळे आहेत. या तालीमसंस्था आणि मंडळे म्हणजे पेठेच्या व त्या त्या परिसराच्या शान आहेत. या तालीमसंस्था मंडळांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. कोल्हापूरच्या अस्मिता असणाऱ्या अशा काही तालीमसंस्था आणि मंडळांच्या इमारती मोडकळीस आल्या होत्या. तर काही मंडळांना सामाजिक उपक्रमांसाठी, व्यायामशाळांसाठी नूतन इमारत बांधण्याची आवश्यकता होत. त्या तालीमसंस्था आणि मंडळांना उर्जितावस्था आणण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी अनेक तालीम संस्था आणि मंडळांच्या इमारत बांधकामासाठी आमदार फंडातून भरघोस निधी वितरीत केला आहे.
उत्तरेश्वर पेठ येथील श्री अष्टविनायक तरुण मंडळाच्या नूतन वास्तूच्या उभारणी करिता रु.पाच लाख निधी मंजूर करण्यात आला होता. या वास्तूच्या पायाभरणीचा शुभारंभ आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक शेखर कुसाळे, माजी नगरसेवक संभाजी बसुगडे, शिवसेना विभागप्रमुख सुरेश कदम, युवासेनेचे शिवतेज सावंत, सनी सावंत, शिवाजी बसुगडे, अरविंद बेंडके, राजेंद्र बेंडके, शिवाजी चौगुले, हिंदुराव नलवडे, जयसिंग पाटील, सतीश सावंत, बाबुराव पोवार, रामचंद्र साठे, संजय यादव, अरुण सावंत, अधीर मारुलकर, जीवन नलवडे, श्रीनिवास सावंत, संजय सावंत, संतोष साठे, शिवाजी सुतार, प्रकाश पाटील, अजित चिकोडकर, स्वप्नील सावंत, अमोल सावंत, विशाल भोसले, योगेश भोसले, रोहित भोसले, अक्षय भोसले, ओंकार म्हेतर, ओंकार बेंडके, स्वप्नील बेंडके, आशिष सावंत आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply