
सोनी सबवरील मालिकांच्या चाहत्यांसाठी उत्साहपूर्ण काळ लवकरच येणार आहे. सर्व मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे आणि लवकरच मालिकांचे नवीन एपिसोड्स पाहायला मिळणार आहेत. सोनी सबवरील हलकी-फुलकी कौटुंबिक मनोरंजनपूर्ण मालिका ‘तेरा क्या होगा आलिया‘ने देखील नवीन एपिसोड्ससाठी नवीन रोमांचपूर्ण पटकथेसह शूटिंगला सुरूवात केली आहे.आलिया व ताराच्या जीवनामधील नवीन अध्यायाचा उलगडा होणार असताना मालिकेमध्ये तारा व सौदामिनीच्या भूमिकेमध्ये अनुक्रमे छावी पांडे व नीलू कोहलीचा प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. ‘तेरा क्या होगा आलिया‘ मालिका आलिया (अनुषा मिश्रा), आलोक (हर्षद अरोरा) आणि तारा यांच्या अवतीभोवती फिरते. हे तिघेही आग्रामधील ज्ञानसरोवर स्कूलमध्ये शिक्षक आहेत.
आलिया व ताराच्या जीवनाला मोठे वळण मिळणार आहे, जेथे त्या त्यांच्या व्यावसायिक जीवनांमध्ये नवीन भूमिका घेण्यासाठी सज्ज आहेत. एकाच शाळेमध्ये शिक्षिका असल्यामुळे आलिया व तारा उप-मुख्याध्यापिका पदासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आल्या आहेत. पण नवीन मुख्याध्यापिका सौदामिनीच्या येण्याने शाळा हिंदी माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन विभागांमध्ये विभागण्यात येणार आहे. नीलू कोहलीद्वारे साकारण्यात येणारी भूमिका सौदामिनी ही कडक मुख्याध्यापिका आहे, जी तिच्या कर्तव्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास तत्पर आहे. शाळा दोन विभागांमध्ये विभागण्यात आली आहे, जेथे आलिया हिंदी माध्यमाची उप-मुख्याध्यापिका आहे, तर छावी पांडेद्वारे साकरण्यात येणारी भूमिका तारा इंग्रजी माध्यमाची उप-मुख्याध्यापिका आहे.
Leave a Reply