कोरोनाच्या काळातील पोलिसांचे काम कौतुकास्पद :आ.ऋतुराज पाटील

 

कोल्हापूर:कोरोनाच्या काळातील पोलिसांचे काम कौतुकास्पद आहे .पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळताना स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी असे प्रतिपादन आ.ऋतुराज पाटील यांनी केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , करवीर डीवायएसपी , डॉ.प्रशांत अमृतकर, शहर डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांकशी त्यांनी झूम मीटिंगद्वारे संवाद साधला.
या मीटिंग मध्ये गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे, सानेगुरुजी, सुभाषनगर येथील पोलीस आर .के.नगर पोलीस स्टेशनला मान्यता, परप्रांतीय मजूर परत आल्यावर त्यांची नोंदणी, कोरोना प्रबोधनासाठी पोलीस खात्याबरोबर इतर विभागांचा समावेश, बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी होमगार्ड मिळणे, पोलीस विभागाला आरोग्य विभागप्रमाणे इतर कामासाठी निधी मिळणे, ट्रॅफिक सुरळीत करणे राजारामपुरी भागात दिशादर्शक फलक लावणे आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात जसे सर्व डॉक्टर लोकांना सेवा देण्यासाठी काम करत होते, तसे पोलीससुद्धा या काळात रात्रंदिवस कार्यरत होते. सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी संकटाच्या काळात केलेले काम हे सलाम करावे असेच आहे.कोरोनाच्या काळात घरी राहा आणि सुरक्षित राहा असा संदेश सर्वत्र दिला जात होता .पण सर्व पोलीस मात्र घराबाहेर पडून कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी,रस्त्यावर कोणी फिरू नये, नाक्यावरून विना पास कोणी प्रवेश करू नये, या सारखी जिवावर बेतणारी कामे करत होते. अगदी घरी गेल्यावर आपल्या कुटुंबियांना , मुलाना भेटणे सुद्धा आपल्याला कठीण झाले होते. पण हे असले तरी आपण आपले कर्तव्य महत्वाचे मानून लोकांच्या सुरक्षिततेसाठी काम केले, याबद्दल पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक करतो.लोकांच्या सुरक्षिततेबरोबर पोलिसांची सुरक्षितता सुद्धा महत्वाची आहे,असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे, सुनील पाटील, वसंत बाबर, सुशांत चव्हाण, दीपक भांडवलकर , सरोजिनी चव्हाण अदि अधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!