कोविडच्या टाळेबंदी नंतर सार्वजनिक वाहतूकीपेक्षा ग्राहकांचा कल कारकडे:वेंकटराम ममील्लापल्ले

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी:कोविड 19 च्या टाळेबंदी-पश्चात परिस्थितीत मागणीमध्ये बदल झालेला समोर आलंय. पूर्वी सार्वजनिक वाहतूक पर्यायाला असलेला कल हळूहळू मिनी कार प्रकारातील ग्राहक वर्गाकडे सरकलेला दिसतोय. हा न्यू नॉर्मल निकषांचा परिणाम म्हणावा लागेल. या सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या प्रवासाच्या दृष्टीने कार हा सुरक्षित वाहतूक पर्याय ठरतो. क्विडकडे बळकट ग्राहक पार्श्वभूमी असल्याने ते यशस्वी उत्पादन ठरते. त्यामुळेच ग्राहकवर्गाकडून याला खंबीर समर्थन लाभले आहे, असे प्रतिपादन रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम ममील्लापल्ले यांनी केलंय. दरम्यान , आम्ही आमची उत्पादने आणि वित्तीय ऑफर अधिकाधिक प्रमाणात नवीन कार इच्छुकांपर्यंत पोहोचवण्या करिता प्रयत्नशील आहोत असही त्यांनी म्हटलंय.रेनो इंडियाच्या वतीने क्विड ग्राहकांकरिता अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यांचे नवीन आरएक्सएल वेरीयंटचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.वेंकटराम ममील्लापल्ले म्हणाले, रेनो क्विडने लोकलायजेशन लेव्हल आठयांन्नव टक्क्यां पर्यंत गाठली असून हा विचारप्रवाह ‘मेक इन इंडिया’ प्रोग्रामला समर्पक आहे. रेनो क्विडचे ग्लोबल लॉन्च भारतात झाले असून यातून या देशाची ग्रुप रेनो’च्या वृद्धी आकांक्षेतील महत्त्वपूर्ण भूमिकेचे दर्शन घडते. क्विड हा भारतातील आमच्या प्रगतीमधील महत्त्वाचा सहयोगी आहे. क्विडचे अद्वितीय उत्पादन हे डिझाईन, कल्पकता आणि आधुनिकतेने-युक्त असून लॉन्च प्रसंगी आमच्याकरिता गेम चेंजर ठरले आहे. सध्याच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त लॉयल्टी लाभांची सुविधा आहे. हा फायदा डॉक्टर आणि पोलीस खात्याशी संबंधिताना उपलब्ध असेल. त्यांच्या ‘केअर फॉर केअरगिव्हर्स ’ प्रोग्राम अंतर्गत भारतात कोविड – 19 लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यावसायिकांचे आभार मानण्याचा हा प्रयत्न आहे असही त्यांनी शेवटी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!