
वर्षाच्या सुरूवातीला सोनी सबने ‘मॅडम सर‘ मालिका सुरू केली. ही मालिका चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्या दृष्टिकोनांमधून सामाजिक समस्यांचे निराकरण करते. या चारही महिला पोलिस अधिकारी ‘जजबात‘सह, म्हणजेच भावनिकपणे त्यांच्याकडे येणा-या केसेसचे निराकरण करतात. या मालिकेमध्ये एस.एच.ओ. हसीना मलिकच्या भूमिकेत गुल्की जोशी,सब इन्स्पेक्टर करिष्मा सिंगच्या भूमिकेत युक्ती कपूर,हेड कॉन्स्टेबल पुष्पाच्या भूमिकेत सोनाली नाईक आणि कॉन्स्टेबल संतोषच्या भूमिकेत भाविका शर्मा हे कलाकार आहेत.रील लाइफमध्ये सादर करण्यात येणा-या आव्हानांचे सराईतपणे निराकरण करण्याचे गुपित जाणून घेण्यासाठी ‘मॅडम सर‘ची टीम व अभिनेत्रींनी वास्तविक जीवनातील महिला पोलिस अधिका-यांना खास भेट दिली. कलाकारांनी पडद्यावर महिला पोलिसांना सुरेखपणे सादर करण्याच्या बारकाव्यांबाबत देखील चर्चा केली. तसेच त्यांनी सध्याच्या आव्हानात्मक काळादरम्यान आपली सुरक्षा व स्वास्थ्यासाठी मोलाचे योगदान देणा-या वास्तविक जीवनातील महिला पोलिस अधिका–यांचे आभार देखील मानले.
Leave a Reply