
बालवीरचे धैर्य व साहसाने देशभरातील लाखो व्यक्तींचे लक्ष वेधून घेतले आहे. सोनी सबवरील जादुई काल्पनिक मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘ प्रेक्षकांना सुष्ट व दुष्ट यांच्यामधील लढ्याच्या रोमांचपूर्ण प्रवासावर घेऊन जाते. लॉकडाऊननंतर मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘सुपरशक्ती काल लोक विरूद्ध वीर लोक यांच्यामधील बहुपतिक्षित लढ्यासह पुनरागमन करत आहे.अनन्याच्या भरत नगरमध्ये येण्यामागील सत्याचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे. ती नकाबपोश व विवानसोबत हातमिळवणी करत ”अल्टिमेट ट्रिओ”ची निर्मिती करते. ज्याला ते टीम शॅडो असे नाव देतात. ही टीम तिम्नसाचा पराभव करण्याच्या दिशेने वाटचाल करते. सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्स‘चे नवीन एपिसोड्स काही प्रमुख रहस्यांचा उलगडा करण्यासोबत प्रेक्षकांना सुपरशक्तींमधील अंतिम लढ्याच्या जवळ घेऊन जातात. अंतिम युद्ध सुरू होणार आहे, सुष्टांचा दुष्टावर विजय होईल का?नकाबपोशची भूमिका साकारणारा देव जोशी म्हणाला,”नवीन एपिसोड्स अॅक्शनने भरलेले आहेत आणि काही मोठ्या रहस्यांचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे. आम्ही अंतिम युद्धाच्या दिशेने जात आहोत. दीर्घकाळानंतर आवश्यक सुरक्षितताविषयक उपायांसह पुन्हा शूटिंगला सुरूवात झाल्याने खूप चांगले वाटत आहे. मला आगामी पटकथेबाबत समजले तेव्हा मी शूटिंगसाठी आणि नवीन साहसी कृत्यांसह पुन्हा एकदा आमच्या प्रेमळ प्रेक्षकांना भेटण्यासाठी देखील उत्सुक झालो. बालवीर, विवान व अनन्याला सर्वांकडून खूप प्रेम व पाठिंबा मिळेल. ते दोन विश्वांमधील सर्वात मोठ्या युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तर मग ‘बालवीर रिटर्न्स‘ पाहत राहा, जेथे आम्ही रोमांचक नवीन एपिसोड्ससह परतत आहोत.” पाहा ‘बालवीर रिटर्न्स‘ १३ जुलैपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त सोनी सबवर
Leave a Reply