विद्यापीठात ८ फेब्रुवारीपासून मोडी लिपी अभ्यासक्रम

 

20151117_205227-BlendCollageQकोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या वतीने येत्या ८ ते १९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ‘मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम व ॲडव्हान्स सर्टिफिकेट’ अभ्यासक्रम आयोजित केला आहे.

सदर अभ्यासक्रम इतिहास विषयाचे विद्यार्थी व संशोधक यांना मराठा काळातील मोडी लिपीतील कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमांतर्गत सखोल व्याख्यानांसह प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे सहभागी संशोधकांना मराठाकालीन आर्थिक-सामाजिक व राजकीय ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन करण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

दि. ८ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत दररोज ३.३० ते ५.३० वा. असे दोन तास अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. या अभ्यासक्रमास नोंदणीसाठी ०२३१- २६०६११९ तसेच ९६०४९२१४५७, ९६०४३२०७१६, ९४०३१०८५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक तथा अभ्यासक्रम समन्वयक नीलांबरी जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!