
सोनी सब हे भारतातील आघाडीचे हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनल आता आपल्या शोचे नवीन एपिसोड्स १३ जुलै २०२० पासून दाखवण्यास सज्ज आहे. या चॅनलचे ‘खुशियोंवाली फीलिंग’चे ब्रँड तत्व त्यांच्या कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी कायमच राहिले आहे आणि या आव्हानात्मक काळातही त्यांच्या चाहत्यांनी ती कायम ठेवली आहे.आयुष्य आता हळूहळू पुन्हा रूळावर येऊ लागले असताना सोनी सब आकर्षक एपिसोड्स आणि ताज्या स्टोरीलाइन्ससोबत त्याला आणखी चांगले बनवण्यासाठी तयार आहे. सर्व शो काही उत्तम आणि आकर्षक हाय पॉइंट्ससोबत परत येणार आहेत. बालवीर रिटर्न्समध्ये अनोखे चॅलेंज उभे ठाकताना दिसणार आहे, कारण सुपरहिरोज अंतिम युद्धासाठी तयार होत आहेत. अलादीनः नाम तो सुना होगामध्ये अलादीनचा आपल्या प्रियजनांना वाचवण्याचा कठीण प्रवास सुरू होत आहे. भाखरवडीमध्ये एक मोठी काळझेप दाखवण्यात आली आहे आणि आघाडीच्या जोडप्याच्या मस्तीखोर मुलाने गोखले व ठक्कर कुटुंबियांच्या आयुष्यात प्रवेश केला आहे. तेरा क्या होगा आलियामध्ये आलिया आणि ताराच्या आयुष्यात एक नवीन अभ्यासक्रम सुरू होतोय आणि आलिया स्थितीवर स्वार होऊन नवीन जबाबदा-या कशा स्वीकारते व शाळा नवीन इंग्लिश मीडियमचा भाग सुरू करत असताना ती नवीन आव्हानांचा सामना कसा करते हे पाहणे मजेशीर असेल. ही ‘देसी विरूद्ध अंग्रेजी’ अशी लढाई असेल.मॅडम सरमध्ये टीम अत्यंत साहसाने व उत्साहाने कठीण केसेस सोडवणे सुरूच ठेवते आणि तेनाली रामामध्ये रामा परत येऊन विजयनगरला वाचवण्यासाठी आपली बुद्धिमत्ता वापरण्यासाठी तयार आहे.
Leave a Reply