
कोल्हापूर :”कोरोना महामारी आपत्ती मुळे आर्थिक संकटात असलेले व दरमहा ३०० युनिटस च्या आत वीज वापर असणारे राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करणेत यावीत व या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने कोविड पॅकेज वा अनुदान स्वरूपात करावी” या मागणीसाठी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व वीज बिलांची होळी करण्यात आली व त्यानंतर जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले.कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन संपल्यानंतर पालकमंत्री मा. ना. सतेज पाटील यांनी शाहू कॉलेज, कदमवाडी येथे स्वतः येऊन मा. एन. डी. पाटील यांची भेट घेतली. यावेळी मा. एन. डी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे यांनी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्वपक्षीय कृति समिती यांच्या वतीने म्हणणे मांडले व मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी बोलताना ना. सतेज पाटील यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका मांडली व मा. उर्जामंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी तातडीने चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील भुयेकर, बाबासाहेब देवकर, समीर पाटील, राजन मुठाणे, राजू सुर्यवंशी इ. प्रमुख उपस्थित होते.यावेळी वीज तज्ञ प्रताप होगाडे, माजी खासदार राजू शेट्टी ,बाबासाहेब पाटील भुयेकर ,विक्रांत पाटील किणीकर, आर के पवार ,बाबा पार्टे, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, समीर पाटील व सचिव मारुती पाटील उपस्थित होते.
Leave a Reply