
कोल्हापूर: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांच्या लॉक डाऊन ची घोषणा केली. या दरम्यान दूध,औषधे, हॉस्पिटल वगळता सर्व बँका, दुकाने, कारखाने, भाजीपाला बंद करण्यात आले. रस्त्यावर तब्बल दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोना ची साखळी तोडण्यासाठी हा लॉक डाऊन करणे आवश्यक होते. तसेच बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांसाठी देण्यात येणारे प्रवासी पास देखील पंधरा दिवसांसाठी स्थगिती करण्यात आले आहेत. समूह संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यासाठी लोकांनी लॉक डाऊन च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विनाकारण फिरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. विना मास्क पण अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना पाचशे रुपये दंड तर विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या लोकांना जागीच दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असून दुचाकी जप्त केली जाणार आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे.या सर्व नियमांचे पालन लॉक डाऊन च्या पहिल्या दिवशी लोकांनी केले असल्याचे शहरात दिसून आले. संपूर्ण बाजारपेठ व मुख्य रस्ते सामसूम होते.सात दिवस घरात राहण्यासाठी लोकांनी आधीपासूनच तयारी करून ठेवली होती. मुखतः भाजी मार्केट बंद केले असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. एकूणच पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा लॉक डाऊन ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
Leave a Reply