कोल्हापूर : कोल्हापूर हे जातीय सलोखा आणि धर्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे.तरी काही परप्रांतीय लोक व्यवसायाकरिता इथे येऊन आर्थिक गब्बर झाले आणि पैशाच्या जोरावर स्थानिक गुंडांना हाताशी धरून पारस ओसवाल आणि त्यांचे नातेवाईक ओसवाल कंपनी तसेच काही मारवाडी समाजातील मोजकेच लोक बेकायदेशीरपणे स्थानिक लोकांच्या जमिनी बळकावून सरकारी नियम पायदळी तुडवून अन्याय करत सुटले आहेत.याच्या मागे जीतो म्हणजेच जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन हि संस्था आहे.याविरोधात कोल्हापुरातील बहुजन समाज एकत्रित आला आहे.त्याला पाठींबा देण्यासाठीच माजी आमदार नितेश राणे हे कोल्हापुरात आले आहेत.याची दाखल घेऊन शासकीय यंत्रणेद्वारे या भूमी माफियांवर कारवाई करू,बहुजन समजाला न्याय मिळेपर्यंत यांच्या पाठीशी राहू, कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही,शांततेने लढा सुरु राहील,टोल प्रमाणेच यांनाही हद्दपार करू असे वक्तव्य आज राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. ह्या लढ्याला विविध संघटना,संस्थानी प्रत्यक्ष पाठींबा दिला आहे असेही यावेळी जाहीर करण्यात आले.

Leave a Reply