एक राखी देशासाठी,एक राखी सैनिकांसाठी;सहज सेवा फौंडेशनचा उपक्रम

 

रायगड : जिल्ह्यातील सेवाभावी सक्रिय संघटना असलेल्या सहज सेवा फौंडेशन,खोपोली तर्फे मागील वर्षांपासून शाळा,महाविद्यालय व विविध भागातून रक्षाबंधनाचे औचित्य साधून देशासाठी लढणाऱ्या सीमेवरील सैनिकांना राखी व शुभेच्छा संदेश लिहून सीमेवर पाठवून हा सण साजरा करत असतात.मात्र कोरोनाच्या संकटामुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत मात्र तरीसुद्धा या उपक्रमात कोणताही खंड पडू नये म्हणून यावर्षी सुद्धा सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून त्यांच्या प्रती प्रेम,देशभवना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सहज सेवा फौंडेशन,खोपोलीच्या जनसंपर्क प्रमुख सौ.जयश्री कुलकर्णी यांनी दिली. सहज सेवा फौंडेशन,खोपोली यांनी यावेळी आवाहन केले आहे की आमच्या संस्थेकडे तुम्ही आपली राखी व त्यांच्या प्रति संदेश एका लिफाफ्यामध्ये द्यावा.कोरोनामुळे विद्यार्थी व नागरिक बाहेर न पडता सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.सहजच्या सदस्यांना संपर्क करून त्याच्यासोबत संवाद साधून,या उपक्रमात आपला सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन केले आहे. सर्व राख्या जमा करून त्यांचे निर्जंतुकीकरण करून सीमेवर पाठविणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख यांनी दिली. त्यामुळे सर्व सुरक्षिततेची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.खोपोली व खालापूर,कर्जत या भागातून शक्य होईल त्या राख्या पाठविण्याचा प्रयत्न आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिक बांधवाना मोठया संख्येने राख्या व संदेश पाठवून त्त्यांच्याप्रती प्रेम व सदभावना व्यक्त कराव्या असे आवाहन तर्फे करण्यात आले आहे.या राख्या पाठविण्यासाठी सदर उपक्रमाचे उपक्रम प्रमुख पूनम तेलवणे 9325787353,अनिता पाटील 9764276504, सुवर्णा मोरे 914513307,शर्वरी कांबळे 8087394072,ॲड.स्नेहा पिंगळे 906707066,सुषमा ढाकणे 8378026597 यांना संपर्क करावा असे आवाहन संस्थे तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!