‘स्टोरीटेल इंडिया’चे ‘सिलेक्ट मराठी’ भारतात दाखल

 

भारतातील लोकप्रिय ऑडिओबुक अॅप ‘स्टोरीटेल’ इंडियाने  खास मराठी श्रोत्यांसाठी ‘सिलेक्ट मराठी’ ही नवीन सेवा १५ जुलैपासून उपलब्ध केली आहे. या सेवेद्वारे श्रोत्यांना फक्त मराठी पुस्तकांचा आनंद घेता येईल. मराठी माणसाला मायबोलीविषयी असणा-या प्रेमामुळे आणि विशेष करून मराठी भाषेतील रसिक श्रोते मोठ्या प्रमाणात स्टोरीटेलला प्रतिसाद देत असल्याने जगात पहिल्यांदाच ही सुविधा मराठी भाषिकांसाठी या अॅपने उपलब्ध करून दिली आहे. स्टोरीटेल अॅप डाऊनलोड केले की आता ‘स्टोरीटेल अनलिमिटेड’ व ‘स्टोरीटेल सिलेक्ट मराठी’ असे दोन पर्याय उपलब्ध होतील. यातील ‘स्टोरीटेल अनलिमिटेड’मध्ये आठ भाषांतील पुस्तके दरमहा केवळ २९९ रूपयांत उपलब्ध असतील. तर, ‘स्टोरीटेल सिलेक्ट मराठी’ फक्त ९९ रूपये प्रति महिना उपलब्ध असेल. यातील ‘सिलेक्ट मराठी’ पर्याय निवडल्यास श्रोत्यांना फक्त मराठी भाषेतील पुस्तके ऐकावयास मिळतील.‘सिलेक्ट मराठी’ बाबत बोलताना स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ म्हणाले,मला अनेक कार्यक्रमांमध्ये प्रश्न विचारला जायचा, की ऑडिओ-बुक केवळ श्रोत्यांच्या मातृभाषेत का उपलब्ध होत नाहीत. हाच विचार पुढे ठेवून, आम्ही ‘सिलेक्ट मराठी’ हे नवीन फिचर फक्त मराठी श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे स्टोरीटेल अॅपमध्ये ‘सिलेक्ट मराठी’ पर्याय निवडल्यास श्रोते फक्त मराठी पुस्तकं ऐकू शकतात. याद्वारे मराठी पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावित हे आमचे ध्येय आहे.“

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!