
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात कोरणा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सोमवार दिनांक २० जुलैपासून सात दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना कोल्हापुरातील जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर,कोल्हापूरच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. जेणेकरुन पोलिसांचे कोरोना या महामारीपासून संरक्षण होईल. जेएसटीआरसी मार्शल आर्ट स्टुडिओच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबवले जातात. या मास्क वाटपाबद्दल पोलिसांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तायक्वांदो प्रशिक्षक अमोल भोसले ब्लॅक बेल्ट ऋषिकेश ईटगी, रोहित खुडे, अभिनव शेटे उपस्थित होते.
Leave a Reply