
अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने घरपोच रेशन पोहोचवण्यासाठी आज ‘मुख्यमंत्री घर घर रेशन योजना’ची घोषणा करण्यात आली. रेशन वितरण व्यवस्थेमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या भ्रष्टाचारामुळे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना रेशन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. या संघर्षाला कायमस्वरूपी बगल देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारने घरपोच रेशन देणाऱ्या योजनेला आज मूर्त स्वरूप दिले.मागील 2 वर्षांपासून या योजनेचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू होते. दिल्लीच्या उप-राज्यपालांकडे या बाबतची फाईल अनेक महिने थांबून होती. परंतु केजरीवाल सरकारच्या रेट्यामुळे त्यांना या योजनेला हिरवा कंदील दाखवावा लागला.या योजनेची पार्श्वभूमी देखील महत्वाची मानली जाते. 2006 पासून अरविंद केजरीवाल हे रेशन दक्षता समितीच्या माध्यमातून दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये रेशन माफियांच्या विरोधात लढा देत होते. आता सत्तेत आल्यानंतर त्यांना या वितरण व्यवस्थेमध्ये असलेल्या अडचणी दूर करण्याचा दृष्टीने त्यांनी ही योजना आणली असून याद्वारे या व्यवस्थेमधला भ्रष्टाचार दूर करून प्रत्येक गरजूला रेशन पोहोच होताना कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेत घरपोच रेशन देणारी ‘मुख्यमंत्री घर घर रेशन योजना’ आणली गेली आहे. केजरीवालांच्या संघर्ष आज या रेशन व्यवस्थेमधील परिवर्तनातून फलस्वरूप दिसून येत आहे.
Leave a Reply