कोल्हापूर येथे बेड अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू
कोल्हापूर : गेले चार महिने राज्यासह देशभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्या दरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या यंत्रणेमुळे कोरोना रोगाचा फैलाव मर्यादित होता. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर स्तलांतरित नागरिकांच्या वाढत्या ओघामुळे कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. गेल्या दहा दिवसात शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णाची संख्या लक्षवेधी प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कोरोना रोगाचा फैलाव थांबविण्यात कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
कालच गांधीनगर मध्ये जवळपास 80 हुन अधिक रुग्ण सापडले त्यापैकीच एका पॉझिटीव्ह असलेल्या वृद्ध व्यक्तीला शासकीय रुग्णालयात जागा नसल्याने सीपीआरकडे पाठविण्यात आले. मात्र सीपीआर मध्ये नवीन कोरोना रुग्ण दाखल करणे मुश्किल झाल्याने बेड उपलब्ध नसल्याने दीड तासांच्या प्रतीक्षेत त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अशाच पद्धतीने तीन कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वास्तविक शासकीय रुग्णालयात मर्यादित क्षमता ओळखून राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे निर्देश खाजगी रुग्णालयांना दिले आहेत. असे असताना उपचारा अभावी बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे.
Leave a Reply