
कोल्हापूर : शिवरायांचे वर्षातील ३६५ दिवसांचे महत्व लोकांना समजण्यासाठी आणि शिवरायांचे शिवचरित्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवदिनदर्शिकेची निर्मिती केली आहे असे प्रतिपादन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केले.या शिवदिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज पार पडला.राजेंची ध्येय धोरणे.मावळ्यांविषयीचे प्रेम.गड,किल्ले माहिती अश्या बऱ्याच विषयांची माहिती याद्वारे मिळणार आहे.या दिनदर्शिकेच्या १० हजार प्रती समाजापर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.संभाजी ब्रिगेड चे उपाध्यक्ष बिद्रीचे प्रवीण पाटील यांनी या अभूतपूर्व दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे.यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासाला चालना देण्यात येणार आहे.यावेळी अध्यक्ष बाळासो पाटील, आदिल फरास,बाबा महाडिक,राजू सावंत,विजय देसाई,हिंदुराव हुजरे-पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply