
कोल्हापूर : अनेक वर्ष राखडलेला कोल्हापूरमधल्या बहुचर्चित टोल विषयावर अखेर सात वर्षांनी पडदा पडला. कोल्हापूरमधील 9 टोल नाके बंद करण्यात आल्याची अधिसूचना आज नगरविकास मंत्रालयाने काढल्याची माहिती दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहिर केले.
कोल्हापूरमध्ये 9 ठिकाणी आयआरबी कंपनीकडून टोल वसुली केली जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूरकरांनी टोल वसुली विरोधात लढा दिला. भाजपने सत्तेवर आल्यास टोल बंद करू असं आश्वासनं दिलं होतं. अखेर वचनपूर्ती करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरमध्ये कोल्हापुरातील 9 टोल बंद करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कोल्हापुरातील 9 टोल बंद करण्यात करण्यात आले.आज राज्य सरकारने टोलबंदीची अधिसूचना काढली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरच्या टोलच्या विषय आता पूर्णपणे संपलाय. मुंबई शहरातील एंट्री पॉईंट आणि पुणे-मुंबई हायवेवरील टोल नाक्यांबाबत सरकारने एक समिती केली होती. त्या समितीचा अहवाल आला आहे. त्यावर सरकार विचार करत आहे. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं
Leave a Reply