
कोल्हापूर- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत शिवसेनेने घेतलेली तटस्थ राहण्याची भूमिका हि मातोश्री वरून आलेल्या आदेशानुसारच घेतली आहे. महापालिका निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून शिवसेना हि भाजप सोबत नव्हती. त्यामुळे सभापती निवडीत भाजप- ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना मतदान न करता शिवसेनेच्या नगरसेवकांनी मातोश्रीच्या आदेशाच पालन केल असल्याच मत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार अरुणभाई दुधवाडकर यांनी केले. ते कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दुधवडकर म्हणाले, महापालिका निवडणुकीत सुरुवाती पासूनच भाजप ने ताराराणी ला जवळ केल होते. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढली आणि ४ नगरसेवक निवडून आले. आता देखील विविध विषय समिती सभापतीच्या निवडीत सत्ताधारी पक्षाकदुन आम्हाला विविध ऑफर्स होत्या. परंतु शिवसेनेन त्या नाकारल्या. कारण कोन्ग्रेस आणि राष्ट्रवादी हा आमचा मुख्य विरोधक आहे. या सभापती निवडीसाठी कधीही मला किंवा स्थानिक आमदारांना , जिल्हा प्रमुखांना चंद्रकांत पाटील , महेश जाधव यांचा फोन आला नाही . फोन आला असता तर पक्षाच्य वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला असता.
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव , नगरसेवक नियाज खान यांचेसह आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply