
सोनी सबवर मैत्रीचे नवीन वारे वाहणार आहेत, जेथे भारताचे आघाडीचे हिंदी जीईसी चॅनेल नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं‘ सादर करण्यास सज्ज आहे.ही मालिका जयपूरमधील बंसल कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे. मालिकेची कथा वडिल राजीव व मुलगा रिषभ यांच्यामधील नात्याला सादर करेल. सुदीप साहिरने राजीवची भूमिका साकारली असून अंश सिन्हाने किशोरवयीन मुलगा रिषभची भूमिका साकारली आहे. राजीव आजच्या काळाशी जुळवून घेऊन त्याच्या मुलाच्या जीवनाचा भाग बनण्यास उत्सुक आहे. हे करण्यासाठी तो वास्तविक व आभासी जीवनामध्ये रिषभचा मित्र बनण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या मुलाची वडिलांच्या रूपात मित्र असण्यासाठी अनिच्छा आणि वाटणारी लाज यामुळे राजीव माघार घेतो. रिषभ त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करतो आणि त्यांचा आदर देखील करतो. पण त्याला ते फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित ठेवायचे आणि त्याची जीवनामध्ये जिज्ञासू ‘मित्र‘ असण्याची इच्छा आहे.‘तेरा यार हूं मैं‘ची कथा बदलत्या काळामधून प्रेरित असून कुटुंबातील प्रत्येक पिढीवर असणा-या संस्कारांना सादर करते. ही मालिका बंसल कुटुंबामधील अनेक पिढ्यांपासून असलेल्या वडिल-मुलामधील नात्याची झलक दाखवेल.सोनी सबच्या या जीवनाचा सार दाखवणा-या मालिकेमध्ये सुदीप साहिरने राजीव बंसलची भूमिका साकारली आहे. राजीव हा एक जबाबदार व पुरोगामी वडिल आहे. त्याला मुलगा रिषभचा रिअल-लाइफ हिरो बनण्याची त्याची इच्छा आहे. अभिनेत्री श्वेता गुलाटीने दयाळू व स्वावलंबी आई जान्हवी बंसलची भूमिका साकारली आहे. ती राजीवला त्याच्या मुलांच्या समीप असण्यासाठी विविध मार्गांचा सल्ला देते. अंश सिन्हा आजच्या पिढीतील उत्साही व मूडी किशोरवयीन मुलगा रिषभची भूमिका साकारताना दिसणार आहे. राजेंद्र चावला शिस्तबद्ध आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यांना क्रिकेटची आवड आहे आणि जया ओझा प्रेमळ आजीच्या भूमिकेत दिसणार आहे.
Leave a Reply