भागीरथी महिला संस्थेच्यावतीने अभिनव कल्पकता दर्शन ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

 

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे, अनेकांचे नोकरी व्यवसाय बंद पडले, अनेकांना घरी बसण्याची वेळ आली. मात्र या वेळेचा सदुपयोग करत, काहींनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवल्या, काही व्यक्तींनी पर्यावरणपुरक अनोखी कृती केली, तर काहींनी वैशिष्टयपुर्ण सामाजिक कार्य केले. अशा वेगवेगळया कृतीतून समाजाला विधायक संदेश देण्याचे काम ज्यांनी केले, अशा व्यक्तींसाठी कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्था आणि समाजमन संस्थेच्या वतीने, ऑनलाईन, जिल्हास्तरीय कल्पकता दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात केेलेल्या अशा उपक्रमाचा ३ ते ५ मिनिटाचा व्हिडीओ संबंधीतांनी संस्थेकडं पाठवायचा आहे. त्यातून विजेते ठरलेल्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
कोल्हापूरातील भागीरथी महिला संस्था आणि समाजमन संस्थेच्या वतीने, जिल्हास्तरीय कल्पकता दर्शन  स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. ही स्पर्धा  ऑनलाईन आहे. लॉकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग करत अनेकांनी विधायक उपक्रम राबवले, घरच्या टाकाऊ वस्तूपासून वैशिष्टयपुर्ण शोभेची किंवा टिकाऊ वस्तू बनवणे, पर्यावरणपुरक उपक्रम राबवणे, समाज हिताचे कार्यक्रम करणे, अशा वेगवेगळया कृतीतून अनेकांनी उल्लेखनीय काम केले आहे. अशा व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यक्तींनी असे वैशिष्टयपुर्ण उपक्रम राबवले आहेत, त्यांनी त्या उपक्रमाचा ३ ते ५ मिनिटाचा व्हिडीओ बनवायचा आहे. आणि तो व्हिडीओ समाजमन संस्थेचे महेश गावडे, यांच्या ९८२३७६७८५८ या व्हॉटस्ऍप नंबरवर पाठवायचा आहे. आपला अल्प परिचय आणि आय कार्ड साईज फोटोसह हा व्हिडिओ स्पर्धकांनी पाठवायचा आहे. ही स्पर्धा १५ ऑगस्टपर्यंत खुली आहे. हा व्हिडीओ कुणाची कॉपी करणारा किंवा कुणाच्या भावना दुखावणारा नसावा. स्पर्धा १८ वर्षावरील सर्वांसाठी खुली आहे. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच काही प्रोत्साहनपर बक्षीसेही देण्यात येतील, अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक आणि समाजमनचे अध्यक्ष महेश गावडे यांनी दिलीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!