
सोनी सबवरील मालिका ‘तेनाली रामा’ पात्रं व लक्षवेधक कथांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास कायम यशस्वी ठरली आहे. २० हून अधिक वर्षांनंतर रामा (कृष्णा भारद्वाज) बिरबल (अमित मिस्त्री) व त्याच्या बुद्धिमत्तेविरोधात स्पर्धा करत आहे.विजयनगरमधील सर्वोत्तम राज्यप्रतियोगितामध्ये हरल्याचे सत्य पचवू न शकलेल्या अकबरने दक्षिणी राज्यांना पाणीपुरवठा करणारी धरणे बंद केली. ज्यामुळे विजयनगरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोरड्या पडलेल्या नदीमुळे रामा अकबर आणि बिरबलला मूर्ख बनवण्यासाठी त्याची बुद्धी व हुशारी वापरण्याचा प्रयत्न करतो. तो नदीच्या तळाखाली गुप्त खजिना सापडल्याची बातमी पसरवतो. या खजिन्यामध्ये राणी सुलक्षणा देवीचे (नीता शेट्टी) हिरे असतात. पण बिरबलला या गोष्टीवर विश्वास बसत नाही. या कथेमागील सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नामध्ये अकबर व बिरबल उद्योगपतीचा वेष घेत विजयनगरमध्ये प्रवेश करतात आणि तथाचार्यकडून (पंकज बेरी) सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ते या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतात. तरीदेखील त्यांच्याकडे रामाला त्याच्या स्वत:च्याच जाळ्यामध्ये अडकवण्याची मोठी योजना आहे. ते एका माणसाला पाठवतात, जो सांगतो की कृष्णा नदीवर कायदेशीर त्याचा मालकीहक्क आहे आणि नदीच्या तळामध्ये असलेल्या हि-यांसह संपूर्ण संपत्तीवर त्याचा हक्क आहे.रामा अकबर व बिरबलला पुन्हा विजयनगरमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत करण्यामध्ये कशाप्रकारे समजावेल? यामध्ये तो राणी सुलक्षणाचे हिरे गमावून बसेल का?
Leave a Reply