फडणवीसांचे मुहूर्त कायम चुकीचेच:मंत्री हसन मुश्रीफ

 

गडहिंग्लज:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत काढत आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्यांना नेमकं काय झालय, हेच समजत नाही असेही श्री मुश्रीफ म्हणाले.गडहिंग्लजमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले , भाजपचे दूध दरासाठीचे आंदोलन योग्य आहे. दुधाला दर मिळालाच पाहिजे . परंतु आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. उद्या शासकीय सुटीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे. अशा परिस्थिती त्यांच्याकडे कोण लक्ष देणार?देवेंद्र फडणवीस यांना अलीकडे काय झालं समजत नाही. त्यांनी काढलेला मुहुर्त नेहमीच चुकीचा ठरत आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजपा कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला. तसेच बेईमान म्हणत टीका केली होती. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, ही कुठली संस्कृती? असा सवालही मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी केलागडहिंग्लज पंचायत समिती कार्यालयात गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, नगरपरिषदेच्या सत्तेत असूनही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कमी निधी मिळाल्याने गडहिंग्लज नगर परिषदेला एक कोटीचा निधी तात्काळ देत आहे. या माध्यमातून ते नगरसेवक आपापल्या प्रभागांमधील विकास कामांवर निधी खर्च करतील.मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर असून आता नागरिकांनी काळजी घेतली नाही तर कोरोना महामारीचा विस्फोट कोणीही रोखू शकत नाही. शहरांसह खेडोपाडी ग्राम दक्षता समितीच्या वतीने घरोघरी स्क्रीनिंग तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे.यामध्ये लक्षणे दिसलेल्या रुग्णावर उपचार होतीलच मात्र अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी कोविंड तपासणीसाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. तरच ही महामारी आटोक्यात येईल. गेल्या पंधरवड्यात कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरूना पॉझिटिव पेशंट सापडत आहेत. त्यामुळे समूह संसर्गाचा धोका अनेक पटीने वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गांभीर्य समजून घेऊन अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.बैठकीत गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेह अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेण्यासाठी शववाहिका नसल्याने परवा डंपर मधून मृतदेह न्यावा लागला असे सांगून शववाहिकाची मागणी केली. यावर मंत्री श्री.मुश्रीफ यांनी क्षणाचाही विलंब न लावता जिल्हा नियोजन अधिकारी यादव यांना संपर्क करीत आपल्या स्थानिक विकास निधीतून शववाहीकेसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. एक-दोन दिवसात ही शववाहिका उपलब्ध होणार आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!