
कोल्हापूर:जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या वतीने आपत्कालीन जन्य परिस्थिती वेळी गेल्या तीन ते चार महिने सातत्याने मदत कार्य *मोफत अन्नछत्र औषध फवारणी निर्जंतुकीकरण ऍम्ब्युलन्स सेवा* इत्यादी लोकसहभागाच्या मदती द्वारे मोफत विशेष सेवा कोल्हापूर शहरामध्ये व शहराच्या बाहेर देण्यात येत आहे सध्या कोल्हापूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना चे प्रमाण वाढल्याने उपचार पद्धती मध्ये समज गैरसमज याचा अभ्यासपूर्वक करून आपत्ती ग्रस्त लोकांना मोफत केअर सेंटर चे उद्घाटन माननीय आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यासाठी 30 बेडची व्यवस्था व जागा जैन बोर्डिंग अध्यक्ष सुरेश रोटे दसरा चौक येथे उपलब्ध करून दिले .कोल्हापूर मेडिकल असोसिएशने द्वारे औषधे व वैद्यकीय सुविधा ऑनलाईन द्वारे उपलब्ध तसेच पल्स oximitar बीपी मॉनिटर काही इमर्जन्सी सेवा केअर सेंटर मध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सकस भोजन आहार covid-19 मोफत औषध प्रसन्न वातावरण व सोशल डिस्टंसिंग त्याचबरोबर स्वच्छता द्वारे रुग्णावर उपचार करण्यात येणार आहे यासाठी मनुष्यबळाची सर्व जबाबदारी व्हाईट आर्मीच्या जवानांनी घेतलेली आहे हे कोवीड सेंटर पूर्णपणे मोफत असून लोकांच्या मदतीने द्वारे सुरु करण्यात आले आहे यासाठी ज्यांना आर्थिक किंवा वस्तुरुप मदत करायची असेल किंवा काही डॉक्टर नर्स आया यांना सहभाग सेवा मदतीसाठी सहभागी व्हायचे असेल किंवा काही मदत कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार असेल तर व्हाईट आर्मीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
आज मोफत केअर सेंटर उद्घाटन प्रसंगी कोल्हापूरचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी व कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आबासाहेब शिर्के जॉइंट सेक्रेटरी शितल देसाई डॉक्टर अमोल कोडोलीकर डॉक्टर शीतल पाटील GPA चे अध्यक्ष डॉक्टर एस के पाटील नेहा असोसिएशनचे अध्यक्ष dr हर्षवर्धन जगताप dr दीपक पवार dr हरीश महानगरे डॉक्टर शिवराज देसाई डॉक्टर धुमाळ डॉक्टर राजेश सातपुते डॉक्टर विनायक शिंदे डॉक्टर महादेव जोगदंड हर्शल सुर्वे जयेश ओसवाल व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यानी सर्वांचे स्वागत केले
Leave a Reply