राॅबीन हुड व हिंदुस्थान बेकरीच्या सहकार्याने स्वच्छता दुतांचा सत्कार

 

कोल्हापूर:गेल्या ४ वर्षांपासून कोल्हापूर शहरात राॅबीन हुड आर्मी गोरगरिबांना अन्नधान्य वाटपचे महान कार्य करत आहेत, लोकांची भूक भागविण्यासाठी अन्नाची गरज असते तशीच आपल्या बुद्धीच्या वाढीसाठी शिक्षणाची गरज असते म्हणून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित मुलांसाठी राॅबीन हुड अॅकडमीची सुरुवात झाली. शहरातील झोपडपट्टी आणि होस्टेलमध्ये राॅबीन हुड अॅकडमीचे स्वयंसेवक लहान मुलांना शिक्षणाचे धडे गिरवत आहेत तसेच वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये वेगवेगळे विषय रुजवत असतात. लहान मुलांना पीवीआर मध्ये सिनेमा दाखवणे, वृक्षारोपण, तसेच कौशल्य विकास यासारखे विविध उपक्रम अभ्यासासोबत राबविण्यात येतात.
ह्या वर्षी कोरोना काळात आपले पोलिस कर्मचारी, आरोग्य सेवक यांना आपण कोरोना योध्दा म्हणून संबोधतो पण वर्षातील ३६५ दिवस आपले सफाई कर्मचारी हे आपला स्वतः चा जीव धोक्यात घालून प्रत्येक संकटाशी सामना करत असतात.
फ्रेंडशिप डे चे निमीत्त साधून अॅकडमी कोल्हापूरच्या वतीने शनिवारी आणि रविवारी राॅबीन हुड अॅकडमी ने शहरातील १०० हून अधिक स्वच्छता दुतांचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येक स्वच्छता कर्मचारी यांना लहान मुलांनी आपल्या हाताने बनवलेले आभार पत्र तसेच सुरक्षा उपकरणे फेस मास्क, ग्लोव्हज इत्यादी वस्तू आणि कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध बेकरी हिंदुस्थान बेकरी यांच्या मार्फत भेटवस्तू देण्यात आल्या.
या उपक्रमात हिंदुस्थान बेकरी चे मालक श्री वहाब शेख तसेच राजाराम काॅलेज चे प्राचार्य श्री अण्णासाहेब खेमनार आणि वर्षा कुलभूषण टिक्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!