
रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, सत्याग्रह असो वा आंदोलनं रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपलं कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. बाबासाहेबांसोबत सावलीसारख्या राहिलेल्या रमाबाईंना त्यांच्या तब्येतीने मात्र साथ दिली नाही आणि त्यांचं निधन झालं. बाबासाहेबांच्या आयुष्यातली ही अतिशय धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना. बाबासाहेबांनी आपल्या खूप जवळच्या व्यक्तींना याआधीच गमावलं होतं. त्यामुळे रमाबाईँच्या जाण्याने महामानवाला आणखी एका दु:खद घटनेला सामोरं जावं लागलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातलं हे भावनिक वळण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतही पाहायला मिळणार आहे.
PROMO: https://www.facebook.com/447970815249907/posts/3300702809976679
Leave a Reply