
प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारी सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘ आणखी एक ट्विस्ट सादर करत आहे. दुष्ट मल्लिकाच्या जादुई शक्तीमधून अम्मीला (स्मिता बंसल) वाचवण्याचा प्रयत्न करणारा अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) अनेक संकटांचा सामना करत आहे आणि तो वेयरवोल्फमध्ये देखील बदलला आहे. तरीदेखील त्याने काहीकरून हार न मानण्याचा निर्धार केला आहे. पण पुढील साहसामध्ये अलाद्दिनला त्याचे मिशन पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज भासणार आहे.मल्लिकासाठी रहस्यमय ठिकाणी असलेल्या खंजरचे ३ भाग शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये अलाद्दिन कल्पना न केलेल्या अडथळ्याचा सामना करतो. तो वेयरवोल्फमध्ये बदलून जातो, पण तो पहिला भाग शोधण्यामध्ये यशस्वी झाला आहे. मल्लिका व तिच्या शक्तींवर विश्वास नसलेला अलाद्दिन तिच्यासोबत करार करतो की अलाद्दिनने तिन्ही भाग मिळवल्यानंतर खंजर मल्लिकाला देण्यापूर्वी ती अम्मीला जिनमधून सामान्य मानवी रूपात आणेल. फरिश्ता म्हणून आलेले अलाद्दिनचे वडिल ओमारला(गिरीश सहदेव) त्यांचा मुलगा मल्लिकासाठी खंजरचे भाग शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजल्यानंतर धक्का बसतो. या खंजरमुळे ती अधिक शक्तिशाली बनेल आणि मानवजातींचा विध्वंस करण्यास सुरूवात करेल. अलाद्दिनचा अखेर त्याच्या वडिलांशी आमनासामना होतो आणि तो अम्मीला वाचवण्यासाठी खंजरचे उर्वरित भाग शोधण्यामध्ये त्यांच्याकडे मदत मागतो.ओमारअलाद्दिनला त्याचे कुटुंब वाचवण्यामध्ये मदत करेल का की तो त्याच्या स्वत:च्या मुलाचा शत्रू बनेल?अलाद्दिनची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्हणाला,”अलाद्दिनच्या खांद्यावर अनेक जबाबदा-या आहेत. त्याला त्याच्या आईचा जीव वाचवायचा आहे, पण बदल्यात तो मल्लिकाला जगाचा विध्वंस करण्यास देऊ शकत नाही. खंजरचा पहिला भाग मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये तो वेयरवोल्फमध्ये बदलून गेला. एक कलाकार म्हणून अत्यंत वेगळे पात्र साकारण्यास मिळाल्याचा माझ्यासाठी हा अद्भुत अनुभव होता. मला आनंद होत आहे की, प्रेक्षकांनी याचे देखील भरभरून कौतुक केले. पण आगामी एपिसोड्समध्ये अनेक सरप्राईजेज पाहायला मिळणार आहेत, जे रोमांच व अॅक्शनने भरलेले आहेत. मला खात्री आहे की, प्रेक्षक आगामी रोमांचपूर्ण कन्टेन्टचा भरभरून आनंद घेतील.”
Leave a Reply