
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे 39 वे सभापती म्हणून मुरलीधर पांडूरंग जाधव, परिवहन समिती सभापतीपदी लाला शिवाजी भोसले, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.वृषाली दुर्वास कदम, उपसभापतीपदी सौ.वहिदा फिरोज सौदागर यांची निवड आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
स्थायी समिती सभापतीपदासाठी मुरलीधर जाधव, सौ.रुपाराणी निकम व सत्यजीत कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या अर्जांची छाननी करुन तिन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये नगरसेवक सत्यजीत कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
यानंतर स्थायी समिती सभापतीपदासाठी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये मुरलीधर जाधव यांना 8 मते तर सौ.रुपाराणी निकम यांना 7 मते पडली. मुरलीधर जाधव यांना सर्वाधिक 8 मते पडल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घोषित केले. या निवडीवेळी स्थायी समिती सदस्य सौ.प्रतिज्ञा निल्ले गैरहजर होत्या. नुतन स्थायी समिती सभापती हे प्रभाग क्र.39, राजारामपूरी एक्स्टेंशन या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहे
Leave a Reply