
कोल्हापूर : कन्नड रक्षक गुंडाकडून सिमावासियांवर अन्याय होत होते. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनीही सीमा बांधवांवर अन्याय केले. त्यास कोल्हापुरातील शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले आहे. आता मात्र कर्नाटक सरकारने हद्द पार केली असून, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा निषेध करीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेने कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन केले.
याठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “कर्नाटक सरकारचा धिक्कार असो” “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला.या वेळी दीपक गौड, रविभाऊ चौगुले, अरुण सावंत, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, किशोर घाटगे, प्रकाश सरनाईक, धनाजी दळवी, सुनील जाधव, अजित गायकवाड, मंदार तपकिरे, सचिन भोळे, राजू काझी, विक्रम पवार, गजानन भुर्के, सनी अतिग्रे, सुशील भांदिगरे, विष्णुपंत पोवार, सुनील खेडकर, दिनेश साळोखे, पियुष चव्हाण, योगेश चौगुले, विश्वदीप साळोखे, मेघराज लुगारे, कपिल सरनाईक, राहुल घाटगे, अनिकेत राउत, किरण पाटील, सुनील करंबे, अंकुश निपाणीकर, गणेश वाळवेकर, शाम जाधव, राहुल माळी, अक्षय खोत, तन्वीर बेपारी, रणजीत सासणे, देवेंद्र खराडे, विशाल पाटील, कृपालसिंह रजपूत, प्रथमेश भालकर यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply