
कोल्हापूर:लॉकडाउनच्या काळात मराठी मनोरंजनाची एक वेगळीच पर्वणी एमएक्स प्लेयरने प्रेक्षकांना दिली आहे. समाजाला आरसा दाखवणारा आणि भावनिक नात्याची गोष्ट सांगणारा ‘मसुटा’ हा चित्रपट एमएक्स प्लेयर आता प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. विविधांगी शैली असलेल्या अनेक कलाकृती मराठी प्रेक्षकांला एमएक्स प्लेयरने दिल्या असून आता ‘मसुटा’ हा नवीन सामजिक चित्रपटही एमएक्स प्लेयरने प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केला आहे.
आपला देश हा विविधतेने नटलेला तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा असला तरीही काही खेड्यापाड्यात अनिष्ट रूढी आणि प्रथा तसेच जातीभेद हा आजसुद्धा पाळला जातो. यावरच आधारित तसेच शिक्षणासाठी झटणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट ‘मसुटा’ आपल्यासमोर आणत आहे. आपल्या समाजात मृत्यूनंतर अंत्यविधी करणे हे फारच गरजेचे समजले जाते असले तरी ते अंत्यविधी करणारा समाज मात्र अनेकांना गरजेचा वाटत नाही. गावाखेड्यांमधील शाळा आजही असे काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना तेथे शिक्षण घेऊ देत नाही. या कुटुंबातील मुलींसोबत कोणीही गावातील मंडळी लग्न करीत नाही. आजही ही कुटुंबे कोणत्याही सरकारी लाभ, योजना व सुविधांसाठी अपात्र मानली जातात. परिस्थिती आणि गाव त्यांच्या विरोधात जाऊन आपल्या मुलाला शिकवण्याची इच्छा असलेल्या बापाची आणि त्याच्या कुटुंबाच्या व्यथेची गोष्ट ‘मसुटा’ मधून आपल्यासमोर येणार आहे. मसुटाचे दिग्दर्शन अजित देवळे यांनी केले आहे. नागेश भोसले, हृदयनाथ राणे, अनंत जोग, अर्चना महादेव, रियाज मुलानी, कांचन पगारे, वैशाली केंडळे, यश मोरे हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
Watch the trailer now – https://bit.ly/Masuta_Trailer,
Watch the movie now – https://bit.ly/Masuta_YT
Leave a Reply