‘बालवीर रिटर्न्‍स’मध्‍ये विवानकडून त्‍याच्‍या अस्तित्त्वाबाबत धक्‍कादायक खुलासा

 

सोनी सबचा लाडका सुपरहिरो बालवीरने धक्‍कादायक उलगडा केला आहे. नकाबपोशने (देव जोशी) तिमन्‍साला (पवित्रा पुनिया) ठार करण्‍यासाठी अनोखी शक्‍ती प्राप्‍त करण्‍याचा अंतिम संकेत सांगितल्‍यानंतर बालवीर ऊर्फ विवानला (वंश सयानी) अखेर त्‍याच्‍या अस्तित्त्वाबाबत सत्‍य समजले आहे. शेवटच्‍या संकेतामधून असे समजते की, तिम्‍नसाला ठार करू शकणारी एकमेव शक्‍ती म्‍हणजे विवान, ज्‍यामधून हृदयभंग करणारे सत्‍य उघडकीस येते की विवान हा करूणाचा (जया बिंजू) मुलगा नाही. ‘बालवीर रिटर्न्‍स’ मालिका नाट्यमय वळण घेणार आहे, जेथे विवान अनपेक्षित उलगड्याचा सामना करतो अणि तिम्‍नसासोबत अंतिम लढ्यासाठी सज्‍ज आहे.नकाबपोश व अनन्‍या (अनाहिता भूषण) अखेर शेवटच्‍या संकेतापर्यंत पोहोचतात. या संकेतामधून उलगडा होतो की विवान हाच तिम्‍नसाचा पराभव करू शकणारी जगातील एकमेव शक्‍ती असतो. या धक्‍कादायक उलगड्यासोबतच विवानला पृथ्‍वीवरील त्‍याच्‍या ख-या कुटुंबामागील सत्‍य देखील समजते. करूणा ही त्‍याची खरी आई नसल्‍याचे आणि त्‍याचे संपूर्ण जीवन खोट्याने भरलेले असल्‍याचे समजल्‍यानंतर विवानला धक्‍का बसतो आणि त्‍याचा हृदयभंग होतो.दुसरीकडे, विवानच्‍या या दुविधेचा फायदा घेत तिम्‍नसा काळ्या हि-याचा उपयोग करत काललोकमधील आत्म्याच्‍या झाडामध्‍ये त्‍याला अडकवण्‍याचे ठरवते. विवानचे मन दुखावलेले असल्‍यामुळे त्‍याला जाळ्यात अडकवण्‍यासाठी तिम्‍नसा एका लहान मुलीचे रूप घेते.विवान या आव्‍हानामधून कशाप्रकारे बाहेर पडेल?तिम्‍नसा विवानला जाळ्यात अडकवण्‍यामध्‍ये यशस्‍वी होईल का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!