
कोल्हापूर: कोरोनाचे रुग्ण वाढत असून गरजेच्या तुलनेत व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी उद्योजकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते. यानुसार कोल्हापूर उद्यम सोसायटी, शिरगावकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व घाटगे-पाटील इंडस्ट्रीज यांनी आज सीपीआरला व्हेंटिलेटर दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात २१ लाख रुपये किमतीची तीन व्हेंटिलेटर सीपीआरला प्रदान करण्यात आली. या व्हेंटिलेटरचा रुग्णांवर उपचार करण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत व्हेंटिलेटरचे लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलला व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. त्यामुळे मदतीसाठी उद्योजक, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.
यावेळी उद्योजक सचिन शिरगावकर, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, मानसिंग जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत चोरगे, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, अशोक जाधव, राजन सातपुते, संगीता नलवडे, दीप्तीजा निकम आदी उपस्थित होते.
Leave a Reply