
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पीटल येथे महापालिकेने अल्पावधीतच नव्याने नुतणीकरण करण्यात आलेल्या हॉस्पीटलचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते, जिल्हयाचे पालकमंत्री नाम.सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर सौ. निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्त्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांना तात्काळ उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने अल्पावधीतच 59 लाख रुपयाच्या निधीतून आयसोलेशन हॉस्पीटचे नुतणीकरण करुन 69 बेड उपलब्ध करुन दिलेले आहेत. यानिधी पैकी महानगरपालिकेने 13 लाख स्वनिधी तसेच जिल्हा नगरोत्थानमधून 46 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. तर रोटरी मुव्हमेंटने 12 लाख खर्च करुन व्हेटीलेटर, बेड, स्ट्रेचर, व्हिलचेअर, स्क्रॅच कार्ड आणी ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. याठिकाणी 4 आयसीयू बेड, 15 ऑक्सीजन स्पेशल रुम तर 50 रुमचा ऑक्सीजन जनरल वॉर्ड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये 25 बेड महिलासांठी व 25 बेडची पुरुषांसाठी व्यावस्था करण्यात आलेली आहे. या हॉस्पीटलच्या शुभारंभामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत होणार आहे.
यावेळी यावेळी उपमहापौर संजय मोहिते, सभागृह नेता दिलीप पोवार, गटनेते अजित ठाणेकर, नगरसेवक संदीप कवाळे, भूपाल शेटे, सचिन पाटील, नगरसेविका सौ.ललिता उर्फ अिʉानी बारामते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ.कृष्णा केळकर, रोटरी क्लब अध्यक्ष संर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, रोटरी क्लब प्रातंपाल संग्राम पाटील, रोटरी क्लब माजी अध्यक्ष ऋषीकेश केसकर, रोटरी मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर माजी उप प्रांतपाल एस.एस.पाटील, रोटरी सनराईज माजी अध्यक्ष शिशीर शिंदे, श्रीकांत झेंडे, गिरीष जोशी, सचिव चंदन मिरजकर, रोटरी मिटम माजी सचिव निवास जोशी व आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply