कोरोनाकडे संकट नव्हे संधी म्हणून बघा:ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ 

 

कोल्हापूर :उमेद अभियानातील स्वयंसहायता गटांनी कोरोनाकडे संकट म्हणून न बघता संधी म्हणून बघावे व जागतिक बाजार पेठेत तग धरण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या व्यवसायामध्ये आमूलाग्रबदल करावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी केले. श्री. मुश्रीफ महाराष्ट्र राज्यग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित ऑनलाइन महिला उद्बोधन मेळाव्यात बोलत होते. अभियानाच्या या ऑनलाइन मेळाव्यात राज्यभरातून जवळ पास एक लाख महिला सहभागी झाल्या होत्या.74व्या स्वातंत्र्यदिना निमित्त महाराष्ट्र राज्यग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिला व समुदाय संसाधन व्यक्तींसाठी ऑनलाईन पध्दतीने महिला उद्बोधन मेळावा राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ़, ग्रामविकास राज्यमंत्री श्री अब्दुल सतार, विधानपरिषद सदस्या व माजी उपसभापती डॉ नीलम गो-हे, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपान्न झाला. या मेळाव्यास राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, उमेद अभियनातील राज्य, जिल्हा, तालुका व क्लस्टरस्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महिला ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाल्या होत्या.
या उद्बोधन मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री मुश्रीफ यांनी स्वयंसहायता गटांची चळवळही महिलांना विकासाच्या मुख्यधारेत आणणारी महत्त्वाची चळवळ असल्याचे सांगितले. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थितीही अर्थार्जनाच्या संधीत परिवर्तित करण्याचे त्यांनी आवाहन केले. महिलांच्या सहभागा शिवाय पुर्ण विकास शक्य होणार नाही. देशास ख-या अर्थाने बलशाली करण्यासाठी महिला सक्षमीकरण अंत्यत गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पुढे ते म्हणाले महिलांनी गटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास ॲमेझानव्दारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम उमेद अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बॅकाकडून घेतलेले कर्ज महिला वेळेवर परतफ़ेड करत आहेत ही खुप गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी उमेद वार्तापत्र स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे प्रकाशन केले. दिनांक 15ऑगस्ट 2020 ते 31 ऑगस्ट2020 या कालावधीत ‘जागरअस्मितेचा’ ही मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. तरी यामध्ये जास्तीत जास्त गटांनी सहभाग़ी होऊन सॅनिटरी नॅपकिन विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा व गावातील प्रत्येक ताईनी ‘अस्मिताप्लस’ हे सॅनिटरीनॅपकीनचा वापरावे असे त्यांनी आवाहन केले तसेच ‘एक ग्रामपंचायत एक बी सी सखी’ या उपक्रमाला अधिक गती मिळण्याकरीता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० दरम्यान ‘उमेद महिला सक्षमीकरण-बीसीसखी / डिजी पे सखी अभियान’ राबविण्यात येणार असून या मोहिमेतून ग्रामस्थांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले आहे. या अभियानास यशस्वी करण्यासाठी जास्तीतजास्त महिलांनी बीसीसखी म्हणून कामकरण्यासाठी पुढाकारघ्यावा असेत्यांनी आवाहन केले.
समाजामधील 50 टक्के शक्ती म्हणजे नारी शक्ती आहे. या नारी शक्तीचा सन्मान व सक्षमीकरण उमेद अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत असून स्वयं सहाय्यता गटांच्या माध्यमातून निर्माण होणा-या उत्पादनास बाजारपेठ उमेदच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री श्री अब्दुल सतार यांनी केले. विधानपरिषद सदस्या तथा माजी उपसभापती विधानपरिषद डॉ नीलम गो-हे मार्गदर्शन करताना म्हणाल्या उमेद अभियानामुळे महिला अधिक अभिव्यक्त होत असून त्यांची राजकीय भागीदारी वाढली आहे व महिलांना नवीन ओळख निर्माण झालेली आहे. आर्थिक समावेशन व बीसी सखी या उपक्रमाबाबत उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात अस्मिता जागर महिमेची माहिती उपसंचालक श्री दादाभाऊ गुंजाळ यांनी दिली तर समाजिक समावेशन विषयक राज्य अभियान व्यवस्थापक (सामाजिक समावेशन व संस्थीय बांधण) श्रीमती वैशाली ठाकूर व उपजीविके विषयक राज्य अभियान व्यवस्थापक (उपजीविका) श्री योगेश भामरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अवर सचिव श्री चंद्रमणी खंदारे यांनी केले.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!