कोल्हापूर:घरफाळा थकबाकी प्रकरणी आज गंगावेश येथील लोटस हॉस्पीटल सील करण्यात आले. लोटस हॉस्पीटल यांचे रु.1 कोटी 19 लाखाचे थकबाकी
बाबत मा.आयुक्तसाो यांचेसमोर सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीमध्ये त्यांना घरफाळा भरणेसाठी 15 दिवसाची मुदत दिलेली होती. दिलेल्या मुदतीत देखील घरफाळा भरला नसलेने मा.आयुक्तसाो यांचे आदेशाने आज लोटस हॉस्पीटल सील करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कांरडे यांचे मार्गदर्शनाखाली कर अधिक्षक विशाल सगुते, लिपीक सुभाष ढोबळे, गणेश भोसले, संजय अतिग्रे व कर्मचारी यांनी केली.
थकीत मालमत्ता कर असलेल्या मिळकतीच्या बाबतीत आयुक्तसाो यांचेसमोर सुनावणी घेणेत आलेली आहे. या सुनावणीमध्ये थकीत कराची रक्कम जमा करणेबाबत आयुक्तांनी काही दिवसांची मुदत दिलेली आहे. मुदत संपलेल्या मालमत्तेवर कारवाई करुन अहवाल देणेच्या सुचना आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिलेल्या आहेत. तरी सर्व संबधीतांनी आपला थकीत घरफाळा भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply