
कोल्हापूर:आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित,राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्यावतीने आयोजित ,भवानी मंडप येथील खाशाबा जाधव त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले ,खाशाबा जाधव हे ऑलिंपिक पदक विजेते , भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते,तसेच हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आला होता,राष्ट्रीय जिल्हा तालीम संघाचे संचालक रणजीत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारा दरम्यान दीनानाथ सिंग यांचे मार्गदर्शन कानी पडले त्यातील एक वाक्य असे की आपले शरीर आपली खरी संपत्ती आहे,आपल्या शरीरासाठी आपण योग्य तो व्यायाम करून शरीर उत्तम ठेवावं,या सत्कार दरम्यान उपस्थित असणारे राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यां डॉ गुरुदत्त म्हडगुट,राहुल चौधरी,रणजीत पाटील,रणजित जगताप,हिंदकेसरी दीनानाथ सिंह,अभय सिंह,निर्भय सिंह,अनिल पाटिल तसेच राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप व त्यांचे इतर सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply