
कोल्हापूर : पारंपारिक फुटबॉल खेळाबरोबरच विविध पैलूंनी व्यक्तिगतही विक्रम नोंदवता येतात मात्र त्यासाठी प्रदीर्घ सातत्याने परिश्रम , सराय , आहार नियंत्रण , योगासह शारिरिक क्षमता वाढवणे अशा विविध पैलूंनी जाणकारांच्या सल्ल्याने सक्रिय असणे गरजेच असते . त्यानंतरच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणारी कामगिरी करता येते हे युवा फुटबॉलपटू प्रणव भोपळे याने कृतिशीलपणे दाखवून दिले आहे . त्याच्य या कामगिरीने कोल्हापुरसह पश्चिम महाराष्ट्राच्या क्रीडा विश्चाला वेगळी झळाळी लाभली आहे , अशा शब्दात पै . बाबा महाडिक यांनी गौरोदार काढले . या औपचारिक सत्कार सोहळा आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्याप्रारंभी श्रेयस भगवान यांनी सर्वांचे स्वागत करत प्रणवच्या आगामी क्रीडा प्रगतीसाठीही शुभेच्छा देत नेहमी पाठीशी राहणार असल्याचे सांगितले . शाहू मरेथॉनचे किसन भोसले यांनी कोल्हापुरातील पेठापेठातील फुटबॉलला हा एक वैश्विक आयाम देण्याचे काम प्रणचने केले असल्याचे आपल्या शुभेच्छापर भाषणात नमूद केले . सावली – श्रीज उपक्रमाचे आणि प्रणवच्या विश्व विक्रमात प्रशिक्षित डॉक्टर , आहारतजसह विविध जाणकारांच्या यथोचित मार्गदर्शनाची पार्श्वभूमी किशोर देशपांडे यांनी सविस्तरपणे सांगत आगामी काळाची ही भक्कम सुरवात असल्याचे नमूद केले . जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापुरचे नूतन अध्यक्ष प्रदीप घाटगे यांनीही यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करत ग्रामीण भागात वडणगेसह कोल्हापुरची अवघ्या महाराष्ट्रासह देशाला नव्याने क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कामगिरीसह ओळख करून देण्याची कामगिरी प्रणव भोपळे प्रारंभीच करून आपल्या उचल कारकिर्दीची झळक दाखवल्याचे सांगितले . यांच्यासह प . बाबा महाडिक यांच्या हस्ते प्रणवचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला . तर जायंटस ग्रुपच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि कोरोनातील कामगिरीबद्दल प्रदीप घाटगे यांचा किसन भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रियर्दशनी जाधव यांनीही यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले . आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रणवने भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्यास यामुळे बळ आल्याचे नमूद केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मकोटे यांनी तर आभार अनिता काळे यांनी मानले .
यावेळी विक्रमवीर प्रणवचे वडील अशोक भोपळे , आई प्रतिभा भोपळे , बंधू अजिंक्य भोपळे , सीमा मकोटे , सतीश आकोळकर , तुषार भिवेटे , संजय साळवी , संपत नरके , विश्वास कोरे यांच्यासह कला – क्रीडा पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
Leave a Reply