‘येसूबाईं’ प्रमाणे ‘आर्या’ ची भूमिका ही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल: प्राजक्ता गायकवाड

 

छत्रपती संभाजी महाराज मधिल युवराज्ञी येसूबाई यांची भूमिका अजरामर करणाऱ्या प्राजक्ता गायकवाड हिचे संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून कौतुक केले. प्राजक्ताने ती भूमिका ताकदीने पेलली.आता सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई ‘ या आगामी मालिकेत प्राजक्ता एका कॉलेज गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमीबद्दल ‘स्पीड न्यूज’ शी बोलताना ती म्हणाली
“कोणत्याही कलाकाराला त्याच्या भूमिकेतून स्वीच ऑन…स्वीच ऑफ होता आलं पाहिजे. जोपर्यंत एका भूमिकेत आहे तोवर ती भूमिका जगायची आणि नव्या भूमिकेवर आधीच्या व्यक्तिरेखेची सावलीही पडू द्यायची नाही. यातच तर अभिनयाचं कसब असतं. राणी येसूबाई च्या भूमिकेसाठी त्या भूमिकेला जे गरजेचं होतं ते सर्व प्रशिक्षण आणि मेहनत मी घेतली.आणि अवघ्या महाराष्ट्राने माझं कौतुक केलं. खरं तर मी त्यांची ऋणी आहे. आता येणाऱ्या ‘आई माझी काळूबाई’मालिकेत मी एका कॉलेज युवतीची भूमिका साकारत आहे. ती भूमिका ही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
कोरोनामुळे सगळंच लॉकडाऊन झालं. याच काळात प्राजक्ताने एक नवी मालिका स्वीकारली असून या मालिकेत ती ‘आर्या’ नावाच्या कॉलेज तरुणीच्या लूकमध्ये आपल्याला दिसणार आहे. येसूबाई पेक्षा आर्या ही भूमिका नक्कीच वेगळी आहे.त्यात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेलं नाव म्हणजे अलका कुबल.. अलका ताईं बरोबर काम करणं ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे.या मालिकेत काळूबाईच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आहेत तर ‘लव्ह लग्न लोच्या’ या मालिकेतील लव्हगुरू राघव फेम विवेक सांगळे लीड रोल करणार आहे. आर्या असं काही तरी पाऊल उचलते की तिचे आयुष्य बदलून जाते या वन लाइन स्टोरीवर ही मालिका फुलणार आहे. सध्या धार्मिक दंतकथांवर आधारित मालिकांचा ट्रॅक टीव्हीवर जोरात सुरू आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं, गुरुदेव दत्त, साई, लवकरच येणारी दख्खनचा ‘राजा जोतीबा’ या मालिकांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.
सोनी मराठीवर काळूबाईची कथा मांडण्यात येणार आहे. माणसाची एक श्रद्धा असते. त्यातूनच अशा धार्मिक दंतकथा काही लोकांच्या विश्वासाचा धागा असतात. अशा मालिकांना एक खास प्रेक्षक असल्यानेच ही मालिका करण्यासाठी होकार दिल्याचे प्राजक्ता सांगते.या मालिकेची टॅग लाईन ‘गोष्ट आर्याच्या भक्तीची ,आई काळूबाईच्या शक्तीची’ ही प्रसिद्ध होते आहे.
कॉलेज गर्लच्या लूकसाठी प्राजक्ताने वजन कमी केलं असून हेअर स्टाईल सुद्धा बदलली आहे. नवीन पात्रं साकारताना माझ्याकडे आर्या या भूमिकेतूनच पाहिलं जाईल असा विचार करुन प्राजक्ता या पात्रासाठी विशेष मेहनत घेत आहे. या मालिकेचा फ्लेवर वेगळा आहे. सध्या या मालिकेच शूटिंग सुरु आहे.लॉक डाऊन असल्याने प्राजक्ता ने शूटिंग मधून वेळ काढून ‘स्पीड न्युज’च्या प्रेक्षकांसाठी मुलाखत दिली. महाराणी येसूबाई या भूमिकेप्रमाणेच आर्यावरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतील असा विश्वास या मालिकेचा टिझर पाहिल्यावर नक्कीच वाटतोय.
आर्याची उर्फ प्राजक्ताची नवी मालिका ‘आई माझी काळुबाई’ १४ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे सहकुटुंबासोबत नक्की पाहा फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!