
मुंबई : मुंबईत दिनांक 13 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी होणार असून 15 फेब्रुवारीला होणाऱ्या मेक इन मुंबई परिसंवादाचा समारोप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या या महत्त्वपूर्ण सप्ताहातंर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात 14 फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटीवर सायंकाळी 8 वाजता होणाऱ्या महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमास श्री. ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता बिकेसी मैदानावर आयोजित प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनास ते भेट देणार आहेत आणि त्यानंतर आयोजित मेक इन मुंबई चर्चासत्राचा समारोप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याबाबत शासनाच्यावतीने त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
Leave a Reply